शनिशिंगणापूर – शनिशिंगणापूरत आज शनी प्रदोष असल्याने अचानकपणे गर्दी वाढल्याने व्यावसायिकांबरोबरच देवस्थान प्रशासनाची तारांबळ उडाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शिर्डीकडून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती.पानसनाला सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे शनी शिंगणापूरच्या वैभवात भर पडणार आहे. नेहमी प्रमाणे लटकू गाड्यांना आपल्या दुकानात खरेदीसाठी वाहने वळवित होते.
अचानक गर्दी वाढल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनास मोठी कसरत करावी लागली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त पोपटराव शेट यांच्यासह विश्वस्त लक्ष ठेवून होते.