पुणे – धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्धधम्म परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. बौध्दांची संविधानिक ओळख या विषयावर पुण्यामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत बौद्धाची संविधानिक ओळख आहे का? बौद्ध म्हणून कायदेशीर झालेलो आहोत का? या विषयावर महाचर्चा झाली. भिक्कू, उपासक नेमके कोण आहेत? त्यांची जीवनपद्धती कोणती आहे? असे अनेक विषय यावेळी कार्यक्रमात उलगडण्यात आले
महाराष्ट्रात अनेकांनी जातीचा उल्लेख ‘नवबौध्द’ म्हणून केला आहे. यांना कायदेशीर पद्धतीने बौद्ध करुन सामावून घेणे आणि अधिकारांसाठी पाठपुरावा करण्यासाठी राज्य आणि देशामध्ये विविध ठिकाणी जनजागृती बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीला गतिमान करणा-या कार्यकर्त्यांचा व धम्म प्रचारकांचा ‘धम्मरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.