मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर कंगनाला थेट झाशीची राणी सुद्धा म्हणत नेटकऱ्यांनी समर्थन दिले होते तर आता पालिकेच्या या कारवाईवर दाक्षिणात्य अभिनेता विशाल याने नाराजी व्यक्त केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने कंगनाची तुलना थेट क्रांतिकारक भगत सिंग यांच्याशी करत तिला पाठिंबा दिला आहे.
Dear @KanganaTeam pic.twitter.com/73BY631Kkx
— Vishal (@VishalKOfficial) September 10, 2020
अभिनेता विशालने ट्विट की, “प्रिय कंगना, तुमच्या धैर्याला सलाम. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही या वादात उडी मारली. सरकारच्या प्रकोपाचा सामना तुम्हाला करावा लागत आहे. पण तुम्ही तितक्याच सक्षमपणे उभ्या आहात. हे खूप मोठं उदाहरण आहे. १९२० साली भगत सिंग यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.’