शिरूर -सणसवाडी येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील एका कामगाराला करोनाची लागण झाली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
हा कामगार हडपसर येथून रोज सणसवाडी येथे कामाला येत होता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कामगाराच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील एकूण वीस जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट असणारे पुणे येथून अनेक कंपनी अधिकार कंपनी कामगार रोज येत आहे.
आता हॉटस्पॉट भागातून शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत येथे येणारे कामगार करोना पॉझिटिव्ह आढळू लागल्याने कंपनी कामगार भयभीत झाले आहेत. यामुळे या भागातील गावांनाही करण्याचा धोका होऊ शकतो. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हॉटस्पॉटमधील कंपनी कामगारांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे.