मांजरी बुद्रुक च्या पाण्यासाठी मी कटिबद्ध- माजी आमदार योगेश टिळेकर
मांजरीतील ४२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण
मांजरी – महानगरपालिका हद्दीत निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी बांधिल आहे. त्यामुळे त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मांजरी बुद्रुकसाठी मंजूर ४२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर ,विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी,माजी सरपंच शिवराज घुले,पुरुषोत्तम धारवाडकर, भूषण तुपे,गणेश घुले, माजी उपसरपंच अमित घुले,सुमित घुले,संजय धारवाडकर,प्रमोद कोद्रे,समीर घुले,सुनीता घुले,नयना बहिरट,सीमा घुले,निर्मला म्हस्के,बाळासाहेब घुले, विजया वाडकर,शैलेंद्र बेल्हेकर उपस्थित होते.
मांजरी बुद्रुक च्या पाण्यासाठी मी कटिबद्ध
मी आमदार असताना २०१६ साली ४२ कोटीची मांजरी बुद्रुक गावची पाणी पुरवठा योजना मंजूर करुन आणली होती. त्या योजनेच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यात महादेवनगर, गोपाळपट्टी या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे.या योजनेचे उर्वरित काम पूर्ण करून मांजरी ग्रामस्थांना पाणी द्यायचे आहे. पण यासाठी अजून १२ कोटी रुपये शासनाकडून हवे आहेत. सदरचा मागणीचा प्रस्ताव शासनाकडे २०२१ पासून पडून आहे. परंतु दुर्दैव आहे कि महाविकास आघाडी सरकारने हे पैसे दिले नाहीत.आता पालकमंत्र्यानी हा निधी लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता लवकरच उर्वरित काम सुरु होऊन मांजरीकरांना पाणी मिळेल. याची आम्हांला खात्री आहे.
योगेश टिळेकर माजी आमदार, हडपसर विधानसभा