पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होईल. महात्मा फुले मंडईसमोर पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून विसर्जन मिरवणूक सुरु होणार आहे. त्यासाठी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोने प्रवास केला.
पहिले पाच मानाचे गणपती बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होणार आहेत. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
दरम्यान, या मिरवणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सहभागी होत आहेत. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोने प्रवास केला. महापालिका मेट्रो स्टेशनवरून पालकमंत्री पोलिसांच्या गाडीवरून मंडईला आले.