पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर आणि जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व क्षेत्रातील पेट्रोल पपांवर सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल उपलब्ध होणार असल्याचे आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यत हे पेट्रोल पंप खुले राहणार आहेत.
गेले दोन दिवसांपासून पेट्रोल सर्वसामान्यांना उपलब्ध होणार की नाही याबाबत रोज निरनिराळे आदेश काढण्यात येत होते. त्यामुळे ग्राहकांचा आणि पंप चालकांचा सुद्धा गोंधळ उडाला होता पण आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून सर्वसामान्यांना पेट्रोल देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. पेट्रोल देताना कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र मागू नये. सगळ्यांना उपलब्ध करून द्यावे.
त्याचबरोबर पुणे,पिंपरी-चिंचवड आणि कॅन्टोंमेंट क्षेत्रातील जे कंटेनमेंट झोन आहे त्याभागात जर पंप असेल तर अशा ठिकाणी सर्वसामान्यांना पेट्रोल दिले जाणार नाही, असे ही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.