मुंबई – देशातील नागरिकांना दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले होते. आता केंद्र सरकार पाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकराने देखील पेट्रोल-डिझेलच्या करात कपात केली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या केंद्रीय उत्पादन शुल्क कपातीमुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. त्यात आता राज्य सरकारने पेट्रोल 2.08 पैशांनी तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त केले आहे.
केंद्र सरकारने शनिवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्जायाचा निर्णय देखील घेतला आहे.