मुंबई – दोन नायजेरियन नागरिकांना मुंबईत साकी नाका या पश्चिम उपनगरात ९ कोटी रुपयांच्या मादक द्रव्यांसह अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. साकी विहार रोडवरील हंसा इंडस्ट्रियल इस्टेटजवळ या आरोपींना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून ८८० ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 9 कोटी रुपये आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी हंसा औद्योगिक वसाहतीसमोर बंदोबस्त ठेवला होता, दोन्ही संशयित घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत ८८ मोठ्या कॅप्सूल आढळून आल्या, त्या पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतल्या. ते कोणाला अमली पदार्थ पुरवठा करण्यासाठी आले होते, याचा शोध घेतला जात आहे.