बारामती (प्रतिनिधी) : बारामती चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ न्यू दिल्लीचे माती कला विकास सेलचे राष्ट्रीय चेअरमन दत्ता कुंभार व त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पांजली कुंभार यांना अयोध्या येथे 22 जानेवारी होत आसलेल्या ऐतिहासिक प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आले आहे.
श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र यांचेवतीने पुणे विभागाचे सरकार्यवाहक पोपटराव शिंदे तसेच मंगेश मासाळ, अमोल देशमुख व नवनाथ साळुंखे यांनी दत्ता कुंभार यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका दिली. या ऐतिहासिक सोहळ्यास दत्ता कुंभार हे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ ही कुंभार समाजाची देशव्यापी संघटना असून देशातील प्रत्येक राज्यात कार्यरत आहे. दत्ता कुंभार व त्यांची टिम ही गेले १० वर्षेपासून कुंभार समाजातील तळागाळातील कुंभार काम करणारे कारागीरांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व माती कलेचा विकास यांवर काम करीत आहेत.
खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांचे वतीने राबविण्यात येणारे कुंभार सशक्तीकरण मिशन योजने अंतर्गत देशातील 35000 हून जास्त कुंभार कारागिरांना विजेवर चालणारी यांत्रिक चाके, चिखल मिळणी यंत्रे व आधुनिक माती कलेचे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम दत्ता कुंभार यांचे नेतृत्वा खाली प्रजापती कुंभकार महासंघाने केलेले आहे.
नुकतीच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पंतप्रधान विश्वकर्मा विकास योजना चालू करणेसाठीही प्रजापती महासंघाचे योगदान आहे. अखिल भारतीय स्तरावर काम करणारे कुंभार महासंघाला या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल संपूर्ण देशातील प्रजापती कुंभकार समाजामध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे व श्रीराम प्रभू न्यासाचे अभिनंदन ही होत आहे.