China Coal Mine Accident: चीनच्या एका खाणीत अपघात झाला आहे. हेलोंगजियांग प्रांतात कोळसा खाणीत झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. चीनी माध्यमांनी गुरुवारी (21 डिसेंबर) याबाबत माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोळसा कामगार भूमिगत खाण वाहनात होते. ते रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. जिक्सी शहरातील कुयुयान खाणीत बुधवारी (20 डिसेंबर) दुपारी हा अपघात झाला होता. गुरुवारी चिनी माध्यमांनी याबाबत माहिती दिली.
वृत्तानुसार, अपघातात जखमी झालेल्या सर्व 13 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, अपघाताची कारणे अद्याप अधिकृतपणे समजू शकलेली नाहीत. या घटनेतील बळींचीही माहिती मिळालेली नाही. मात्र काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
चीनमध्ये असे अपघात वारंवार घडते –
वारंवार होणाऱ्या अपघातांना तोंड देण्यासाठी चीन खाणींची सुरक्षा सुधारण्याचे काम करत आहे. गेल्या गुरुवारी (14 डिसेंबर) चीनमधील कोळसा उत्पादक प्रांत शांक्सी येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये शांक्सी येथे कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि सप्टेंबरमध्ये दक्षिण चीनच्या गुइझोउ प्रांतात कोळशाच्या खाणीत लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, गेल्या वर्षी 168 अपघातांमध्ये 245 जणांचा मृत्यू झाला होता.