Shivsena MLA Disqualification Result : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर आज जाहीर केला.अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं.त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही मॅचफिक्सींग असल्याचे म्हंटले होते त्याचा देखील शिंदे यांनी यावेळी समाचार घेतला आहे.
हा सत्याचा विजय. लोकशाहीचा आणि हिंदुत्वाचा आहे. घराणेशाहीला आणि एकाधिकार शाहीलाही मोठी चपराक आहे. लोकशाहीत कोणालाही पक्ष संघटना मालमत्ता म्हणून एकाधिकारशाहीने निर्णय घेता येणार नाही हे आता सिद्ध झालं असलयाचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भरत गोगावले यांना मुख्य प्रतोत म्हणून मान्यता दिलेली आहे त्यासह शिवसेना म्हणून देखील मान्यता मिळाली आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो असं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या निर्णयानंतर कोणालाही मनमानी करता येणार नाही असा माइल्डस्टोन निर्णय झालेला असलयाचे शिंदे म्हणाले.
ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर भाष्य
उद्धव ठाकरेंनी ही मॅचफिक्सींग होती असं म्हंटल होत त्यावर शिंदे म्हणाले,”जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय येतो तेव्हा ती मॅचफिक्सींग नसते. ते सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला देण्याचं काम करतात.त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं शिंदे म्हणाले.
काय म्हणाले होते ठाकरे
नार्वेकरांनी अपात्र कोणालाच केलेलं नाही. मूळ केस अपात्रतेची होती मग तुम्ही आम्हाला अपात्र का केलं नाही.सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिल आहे. ही मॅचफिक्सींग होती असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केला आहे. पक्षप्रमुखाबाबत ते बरेच काही बोलले मग त्यावेळी ते (शिंदे) कशाच्या जोरावर निवडून आले असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होत ते न करता नको त्यामध्ये ते घुसले आणि वेळ काढूपणा त्यांनी केला असं स्पष्ट मत यावेळी ठाकरेंनी व्यक्त केलं.