Stock market closing bell : भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल कायम आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या घसरणीतून सावरल्यानंतर सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. एचडीएफसी बँकेसह इतर बँकिंग समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. तर निफ्टी-50 ने आज नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला आहे.
बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स आज 72,727.87 अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 72,510.24 अंकांच्या नीचांकी आणि 73,130.69 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. तो अखेर 0.48 टक्क्यांनी किंवा 349.24 अंकांनी वाढून 73,057.40 वर बंद झाला.
निफ्टी-50 नवीन विक्रमी पातळीवर –
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी-50 नेही नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टी आज 0.34 टक्के किंवा 74.70 अंकांच्या वाढीसह 22,196.95 वर बंद झाला, जी त्याची आतापर्यंतची उच्च पातळी आहे.
सर्वाधिक वाढ झालेले शेअर्स (Top Gainers) –
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिडचे समभाग सर्वाधिक 4.16 टक्क्यांनी वाढले. याशिवाय HDFC बँकही 2.59 टक्क्यांहून अधिक वाढी झाली. तसेच ॲक्सिस बँक 2.32 टक्के, कोटक बँक 1.83, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेसह 18 कंपन्यांचे समभाग वधारले.
सर्वाधिक घट झालेले शेअर्स (Top Losers) –
दुसरीकडे, टीसीएसचे शेअर्स 1.75 टक्क्यांनी घसरले. तसेच बजाज फिनसर्व्ह 1.03 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.96 टक्के, इन्फोसिस 0.90 टक्के, एचसीएल टेक 0.86 टक्के आणि टीसीएससह 12 कंपन्यांचे शेअर्स वाढले. दरम्यान, एचडीएफसी बँक आणि इतर बँकिंग समभाग आणि निवडक एफएमसीजी समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे आज शेअर बाजार उच्च पातळीवर बंद झाला.
विभोर स्टील ट्यूब्सचे शेअर्स 181.5 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध –
विभोर स्टील ट्यूब्सच्या आयपीओची मंगळवारी शेअर बाजारात ब्लॉकबस्टर एन्ट्री झाली. विभोर स्टीलचे शेअर्स NSE वर 425 रुपयांवर सूचिबद्ध झाले, जे 151 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा 181.5 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच वेळी, विभोर स्टील ट्यूब्सचा शेअर बीएसईवर उत्कृष्ट परताव्यासह 421 रुपयांवर सूचीबद्ध झाला, जो त्याच्या इश्यू किंमत किंवा किंमत बँडपेक्षा 178.81 टक्के जास्त आहे.
पेटीएम शेअर्स वाढले –
Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications Ltd चे शेअर्स गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये 16 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पेटीएमचा शेअर सतत 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला आहे. शेअर्सच्या वाढीमुळे फिनटेक कंपनीचे बाजार भांडवल (MCap) दोन दिवसांत 23,900 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे.
गुंतवणूकदारांचे 11,000 कोटी रुपयांचे नुकसान –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 20 फेब्रुवारी रोजी 391.58 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी 391.69 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 11,000 कोटी रुपयांनी घटले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्स निफ्टीत वाढ होऊनही गुंतवणूक दारांचे नुकसान –
भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. परंतु आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये नफा बुकिंग दिसून आले, त्यामुळे आजच्या व्यवहाराअंती गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची घट झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.18 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण मेटल, आयटी आणि ऑटोमोबाईल समभागात दिसून आली. दुसरीकडे आज रियल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली.