Budget Day Stock Market Closing Bell: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गुरुवारी (दि. 1 फेब्रु.) इक्विटी बेंचमार्क निर्देशांक किंचित नुकसानासह बंद झाले. आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 107 अंकांनी कमजोर झाला. त्याच वेळी, निफ्टीमध्येही 28 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरला.
BSE चा 30 शेअर्सचा मानक निर्देशांक सेन्सेक्स 106.81 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 71,645.30 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आज 71,574.89 ते 72,151.02 च्या रेंजमध्ये व्यवहार केला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीतही 28.25 अंकांची किंवा 0.13 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. निफ्टीने दिवसाचा शेवट 21,697.45 अंकांवर केला. आज निफ्टीने 21,658.75 ते 21,832.95 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.
PSU बँकांच्या शेअर्सनी गुरुवारी चांगली कामगिरी केली, PSB 6 टक्क्यांनी वाढला. आयओबी, इंडियन बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि पीएनबी 4 टक्क्यांहून अधिक वाढले.
पेटीएमचा शेअर लोअर सर्किट –
आरबीआयने काल पेटीएमच्या बँकिंग सेवेवर बंदी घातली होती. यानंतर पेटीएमचे शेअर्स आज 20 टक्क्यांनी लोअर सर्किटवर पोहोचले. ऑनलाइन पेमेंट सेवा प्रदाता पेटीएमला बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नवीन ग्राहक जोडण्याबाबत पेटीएम बॅंकेवर बंदी घातली त्यामुळे पेटीएम बॅंकेला मोठा धक्का बसला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणत्याही प्रकारच्या ठेवी आणि व्यवहार स्वीकारण्यास बंदी घातली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने नियमांचे सतत पालन न केल्यामुळे आणि पर्यवेक्षण संबंधित समस्या लक्षात घेऊन केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला.
सेन्सेक्सचे केवळ 9 शेअर हिरव्या रंगात –
सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी फक्त 9 ग्रीन झोनमध्ये बंद झाले. मारुती, पॉवर ग्रिड आणि ॲक्सिस बँकेत सर्वाधिक नफा झाला. दुसरीकडे, आज LENTI, अल्ट्राटेक सिमेंट आणि JSW स्टीलमध्ये सर्वात मोठी घसरण झाली.
गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटी रुपयांचे नुकसान –
बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे भांडवल कमी झाले आहे. एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व समभागांची एकूण मार्केट कॅप 379.78 लाख कोटी रुपये होती. आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी ते 379.43 लाख कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 35 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे.