नवी दिल्ली – राजस्थान विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींची जादू चालली. राज्यात विधानसभेच्या १९९ जागांसह भाजपने ११५ जागा जिंकल्या. राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपमधून विजयी झालेल्या अनेक आमदारांनी आतापासूनच जनतेचे आदेश ऐकायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाजप आमदार बालमुकुंद आचार्य (BJP MLA Balamukund Acharya) एका अधिकाऱ्याला फोनवर रस्त्यावरून मांसाहाराचे स्टॉल हटवण्याचा इशारा देत असल्याचे दिसून येते. (bjp win rajsthan election)
जयपूरच्या हवा महल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले बालमुकुंद आचार्य 600 मतांनी विजयी झाले आहेत. निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव केला आहे.निवडणुकीत जिंकून येताच त्यांचा ऍक्शनमोड सर्वांना पाहायला मिळतोय. सध्या त्यांच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. (Balamukund Acharya video viral)
व्हिडिओमध्ये आमदार आचार्य एका अधिकाऱ्याशी फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. ते फोनवर म्हणतात, “रस्त्यावर खुलेआम मांसाहारी विकता येतो का? हो किंवा नाही सांगा. ताबडतोब रस्त्यावर सुरु असलेल्या मांसाहाराच्या गाड्या आणि दुकान बंद झाली पाहिजे. मला नाही माहित तुम्ही कोण अधिकारी बोलत आहेत. मी संध्याकाळी तुमच्याकडून रिपोर्ट घेईल.”
#हवामहल में हवा टाइट करने निकले बाबा@dsrajpurohit291 @BalmukundaAach1 pic.twitter.com/AdgjqXaYiB
— Doonger Singh (@dsrajpurohit291) December 4, 2023
ओवेसी यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत हे चुकीचे असल्याचे सांगितले. मांसाहारी विक्री कोणीही थांबवू शकत नाही. जर मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लावायचे असतील तर कोणी ते कसे रोखू शकेल.