पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेला बसला ‘हुशार’ डमी उमेदवार, महिला सुपरवाझरनं ‘असं’ पकडलं

पुणे – मुंबई शहर पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत दुसऱ्याच्या नावावर बसलेल्या डमी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महर्षीनगरमधील एका परीक्षा केंद्रावर उघडकीस आली.

सज्जन कपुरचंद गुसिंगे (28, रा. कौचलवाडी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिला सुपरवायझरने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुंबई शहर पोलीस शिपाई पदासाठी रविवारी महर्षीनगरमधील केंद्रावर परीक्षा सुरू होती.

त्यावेळी महिला सुपरवायझरला एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेबाबत शंका आली. त्यावेळी त्यांनी तपासणी केली असता परीक्षार्थी सज्जन गुसिंगे हा डमी विद्यार्थी असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.