मुंबई- दिवाळी म्हटलं की सगळ्याच बाबतीत रेलचेल सुरु होते. कपडे, पदार्थ, सजावट… मात्र या सगळ्यात नवीन लुक करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असतात. या वर्षी कोरोनामुळे खरेदीसाठी बाहेर पडणे मुश्किल असलं तरी देखील दिवाळीचा लुक तुम्ही क्लासिक बनवू शकता. नव्याला पारंपारिकचा टच असलेले काही लुक नक्की ट्राय करा…
खणाची साडी-
यावर्षी खणाच्या साडीचा ट्रेंड सुरु आहे. त्या खणात वेगवेगळे लुक डिझायनर्स ट्राय करताना दिसत आहे. त्यावर नथ किंवा सरस्वतीची डिझाईन काढलेली खणाची साडी सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. स्वत किमतीत तुम्हाला क्लासिक लुक करायचा असेल तर तुम्ही खणाची साडी नेसू शकता. त्यावर पारंपारिक अलंकार किंवा वेस्टर्न अलंकारसुद्धा परिधान करुन नवीन प्रयोग करु शकता.
फ्रिलची साडी-
जुन्या काळातील काही फॅशनला आता नव्यानं वाव मिळताना दिसतो आहे. त्यातील एक असलेली ही फ्रिलची साडी. सध्या इथनिक लुक करण्याकडे अनेकांचा कल असतो. थोडं इन्डो वेस्टर्न नाहीतर वेस्टर्न लुककडे कल असणाऱ्यांनी ही साडी नक्की ट्राय करा.
कुर्ता प्लाझो-
ज्यांना साडी नेसायची नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे कुर्ता-प्लाझो. अनेकदा मुलींना नवा लुक करायचा असतो. तेेच तेच लुक पाहून आपण सुद्धा कंटाळतो. त्याामुळे मुलींसाठी खास कुर्ता-प्लाझो लुक ट्रेंडमध्ये आहे. त्यावर भरजरी दुपट्टा असेल तर उत्तमच.
खणाची ओढणी-
सण म्हटलं की ओढणीचा ड्रेस परिधान करायचा असा अनेकांचा पण असतो. त्यात भरजरी ओढणी किंवा अनेक प्रकाच्या ओढण्या बाजारात उपलब्ध असतात. त्यातील अनेक ओढण्या भरजरी असतात तर यावर प्लेन ड्रेस परिधना करणे अपेक्षित असते.