नवीदिल्ली – कॉग्रेसने सुरु केलेली ‘भारत जोडो’ यात्रा आता चांगलीच चर्चेत आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर याच यात्रेवरून निशाणा साधल्यानंतर आता काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरून भाजपसह आरएसएसवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये थेट आरएसएसची पॅन्ट दाखवत त्यामध्ये आग लागल्याचे मार्मिक चित्र पोस्ट केले आहे.
काँग्रेसने सोमवारी सकाळी एक छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘भाजप-आरएसएसने पसरवलेल्या द्वेषाच्या साखळदंडातून देशाला आझाद करण्यासाठी एक एक पाऊल आपल्या ध्येयाकडे” अशा आशयाच्या कॅप्शनखाली काँग्रेसने ‘खाकी हाफ पँट’चे छायाचित्र पोस्ट केले असून त्यात एका बाजूने आग लागल्याचे देखील दाखवले आहे.
To free the country from shackles of hate and undo the damage done by BJP-RSS.
Step by step, we will reach our goal.#BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/MuoDZuCHJ2
— Congress (@INCIndia) September 12, 2022
या संपूर्ण प्रकरणात भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा दाखवत काँग्रेसला ही पोस्ट हटवण्यास सांगितले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘काँग्रेस लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच हे ट्विट करण्यात आले आहे. त्यांची भारत जोडो यात्रा ही खरं तर आग लगाओ यात्रा आहे.इतकंच नाही तर संबित यांनी या यात्रेला ‘भारत तोडो यात्रा’ असे देखील म्हंटले आहे.
ये तस्वीर BJP और RSS को प्रतिनिधित्व करते हुए कांग्रेस ने ट्वीट किया और उसमें आग जलते हुए दिखाया है। कांग्रेस ने लोगों को उकसाने के लिए ये ट्वीट किया है। इनकी भारत जोड़ो यात्रा,आग लगाओ यात्रा है। ये पहली बार नहीं है जब कांग्रेस ने इस प्रकार की तस्वीर ट्वीट की हो: संबित पात्रा,BJP pic.twitter.com/OalwDq2mVZ
— ANI_HindiNews (@AHindinews) September 12, 2022