मांजरी – बेबी कॅनाल मध्ये मुंढवा जॅकवेल येथून नदीतील पाणी कॅनाल मध्ये सोडले जात आहे .त्यामुळे नदीतील पाणी सोडल्याने आपोआप बेबी कॅनाल मधील पाण्यात जलपर्णी वाढत आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डास, मच्छर आणि माश्या वाढल्या आहेत. त्यामुळे कालव्याच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तेव्हा महापालिकेने जलपर्णी काढावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मुळा- मुठा नदीच्या पात्रात खूप मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. महानगरपालिकेच्या वतीने स्पायडर मशीनने खासगी ठेकेदाराला जलपर्णी काढण्याचे काम दिले आहे. विविध भागातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढली असून ही जलपर्णी आता मुंढवा जॅकवेल मधून बेबी कॅनॉल मध्ये येत आहे. त्यामुळे बेबी कॅनॉलमध्ये सर्वत्र जलपर्णी ची हिरवी चादर तयार झाली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या संख्येने झाली असून नागरिक या डासांच्या मुळे हैराण झाले आहेत.
अनेक नागरिकांना डेंग्यू , मलेरिया सारखे आजार झाले असून नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बेबी कॅनॉल मधील वाढलेली जलपर्णी तातडीने काढावी, अशी मागणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना केली असून , डासांचा प्रादुर्भाव कमी करावा यासाठी ही औषध फवारणी करावी तसेच डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत अशी मागणी केली आहे. असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.