ठाणे – रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरातील खारफुटीची 281 हेक्टर जागा सिडकोने तेथील वनांचे संरक्षण करण्या करीता वन विभागाकडे सोपवली आहे. या जागे पैकी 134 हेक्टर जागा कामोथे गावच्या हद्दीतील आहे तर 38 हेक्टर जागा पनवेल मध्ये आहे, उर्वरीत 109 हेक्टर जागा कोल्हे-कार मध्ये आहे. त्या जागेवरील वनांचे संरक्षण करण्यासाठी सिडकोने ही जागा वन विभागाकडे हस्तांतरीत केली.
खारफुटीच्या भागातील वनस्पतींमुळे सागरी किनारपट्टीच्या भागातील पर्यावरण व वन संपदेचे संरक्षण होते. आता ही जागा वन विभागाकडे सुपुर्त करण्यात आल्याने आता तेथील जंगल व वनसंपत्तीचे रक्षण होईल. खारफुटीच्या जंगलांमुळे पुराचे पाणी अन्यत्र पसरण्यास प्रतिबंध होतो, तसेच या परिसरात अनेक प्राणी आणि पक्ष्यांचाहीं अधिवास असतो. त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या या जागेला खूप महत्व असते.