मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सध्या हेमांगी एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. “बाई, बुब्स आणि ब्रा’ या कालच्या पोस्ट मुळे हेमांगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
हेमांगीच्या या पोस्टला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्यातच भाजप नेत्या चित्र वाघ यांनी सुद्धा याच मुद्यावरून हेमांगीवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’ हेमांगी कवीने फार साधा व्हिडियो शेअर केला होता ती त्यात पोळ्या लाटताना दिसत आहे. मात्र इंस्टाग्रामवर नेटकऱ्यांकडून नको त्या गोष्टींवर बारीक रितीने पाहणं, त्यावर अश्लील लिहिणं, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेत’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
काय आहे हेमांगी कवीची पोस्ट