मुंबई – अभिनेत्री दिया मिर्झा आई झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. याबाबत स्वत: दिया मिर्झाने सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दियाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखी बरोबर विवाह केला होता. दियाने यावेळी सर्वांचे आभार मानले आहे. अव्यान आझाद असे मुलाचे नाव ठेवले आहे.
💖🙏🏻💖 pic.twitter.com/iL6ioUGc15
— Dia Mirza (@deespeak) July 14, 2021
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मागील बऱ्याच काळापासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली होती. फेब्रुवारीमध्ये लग्न झालेल्या दियाला अवघ्या सहा महिन्यात बाळ झाले. अभिनेत्रीच्या गरोदरपणात अचानक बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते त्यामुळे प्रेग्नेंसी तारखेच्या आधीच म्हणजे १४ मे रोजी बाळाचा वेळेआधीच जन्म झाला होता. मात्र अभिनेत्रीने ही बातमी दोन महिन्यानंतर सांगितली.
https://www.instagram.com/p/CRS8EU4DGGe/?utm_source=ig_embed&ig_rid=bdbaffcd-fc4b-45fe-a33a-d04845fda724
दिया मिर्झाने पोस्टमध्ये लिहिले की, तिच्या मुलाचा जन्म १४ मे रोजी झाला होता आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते आहे. प्रेग्नेंसीदरम्यान तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते आणि जीव जाईल अशी अवस्था होती. अशात इमरजन्सीमध्ये सी सेक्शनच्या माध्यमातून बाळाचा वेळेआधीच जन्म झाला होता. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या हितचिंतकांचे आभार मानले आहेत.