बीजिंग – चीनने दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर तीन लष्करी तळ उभारले आहेत, तेथे त्यांनी जहाजविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, लेझर आणि जॅमिंग गॅझेट्सने सुसज्ज लष्करी व्यवस्था केली आहे. तसेच चीनने तेथे लढाऊ विमाने तैनात करण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे शेजारील देशांना त्यापासून मोठा धोका उत्पन्न झाला आहे.
अमेरिकन लष्कराचे इंडो-पॅसिफिक कमांडर ऍडमिरल जॉन सी ऍक्विलिनो यांनी ही माहिती दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की चीनची तेथील ही तयारी एक धोक्याचा इशारा आहे. त्यांनी तेथे अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्रे आणि अन्य लष्करी सज्जता ठेवण्या मागचे नेमके कारण लक्षात येत नाही. पण त्यांचा इरादा काहीं तरी वेगळाच असून त्याविषयी सावधगिरी बाळगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
याआधी फेब्रुवारीमध्ये, चायनीज पीपल्स लिबरेशनच्या चालत्या लष्करी जहाजाने किनारपट्टीवर सागरी पाळत ठेवत असताना ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या विमानावर लष्करी दर्जाचा लेझर फ्लॅश सोडला होता. यावरून हे सिद्ध होऊ शकते, की ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर चिनी लोकांकडून सर्वात जवळचा लष्करी धोका निर्माण झाला आहे. हे प्रयत्न म्हणजे चीनच्या शक्तीचे प्रदर्शन करण्याचा एक भाग होता, असे ते म्हणाले. चीन आता अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे संरक्षण बजेट वाढवत आहे