पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोव्हॅक्सीनचे केंद्र वाढवले असून, ते 7 वरून 11 केले आहे.
कोविशिल्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 110 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोव्हॅक्सीनचे 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोवॅक्सीन 7 केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यात चार केंद्र वाढवण्यात आले आहेत.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के असून, ऑन दि स्पॉट बुकिंगही 15 टक्के आहे. तर कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 15 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
8 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मंगळवारी जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकिंग 35 टक्के, तर 35 टक्के ऑन दि स्पॉट बुकिंग होणार आहे. 3 जुलैला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 35 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे.