मुंबई – मुंबईतील कुर्ला येथे इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत मुंबईच्या कुर्ला परिसरातील विनोबा भावे पोलीस ठाण्याजवळील आहे. या इमारतीच्या पहिल्या माजल्यावरचा काही भाग आज दुपारी तळमजल्यावर असलेल्या हॉटेलवर कोसळला. या दुर्घटनेत पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर, अन्य तिघे जखमी झाले.
रफीक शेख (वय 46), इरफान खान (वय, 33) आणि मोहम्मद जिकरान (वय, 6) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कुर्ला येथील भाभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.