नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतमध्ये घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच “इंडिया सी वोटर’ने “मूड ऑफ नेशन’ नावाने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातील अव्वल दहा मुख्यमंत्र्यांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अद्याप मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेने मनापासून स्वीकारले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 39 टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 16 टक्के लोकांच्या पसंतीसह दुसऱ्या तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 7 टक्के पसंतीसह तिसऱ्या स्थानी आहेत. एकनाथ शिंदेंना केवळ 2.2 टक्के लोकांनी पसंती मिळाली आहे. या सर्वेक्षणात देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
करोना असूनही ठाकरे अव्वल
दरम्यान, करोना काळात घेण्यात आलेल्या “मूड ऑफ नेशन’ सर्वेक्षणात देशातील अव्वल लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे अग्रेसर असायचे. करोनासारख्य गंभिर परिस्थितीत राज्यभर टाळेबंदी असतानाही जनतेने ठाकरेंना पसंती दर्शवली होती. तसेच, राज्यात आत्ता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला 34 जागांवर विजय मिळेल असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदविले गेले आहे.
देशातील अव्वल लोकप्रिय मुख्यमंत्री
1) योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश, भाजप) : 39 टक्के लोकांची पसंती
2) अरविंद केजरीवाल (दिल्ली, आप) : 16 टक्के
3) ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल, तृणमूल कॉंग्रेस) : 7 टक्के
4) एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू, द्रमूक) : 5 टक्के
5) नवीन पटनायक (ओडिशा, बीजेडी) : 3 टक्के
6) हेमंत बिसवा सरमा (आसाम, भाजप) 3 टक्के
7) शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश भाजप) : 2.4 टक्के
8) एकनाथ शिंदे (महाराष्ट्र, बाळासाहेबांची शिवसेना) : 2.2 टक्के
9) वाय. एस. जगन मोहन रेड्डी (आंध्र प्रदेश, वासएसआर कॉंग्रेस) : 1.6 टक्के
10) भूपेश बघेल (छत्तीसगड, कॉंग्रेस) : 1. 6 टक्के