नवी दिल्ली – एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या न्यायालयात 5 सप्टेंबरला निर्णय घेतला जाणार आहे. सीबीआय आणि ईडीच्यावतीने या चिदंबरम पितापुत्राच्या जामिनाला विरोध केला आहे. या दोघांची चौकशी करण्यासाठी कोठडी मिळावी, अशी मागणी सीबीआय आणि ईडीच्यावतीने दिल्लीच्या न्यायालयात केली गेली आहे.
चिदंबरम यांनी कॉंग्रेसच्या सरकारच्या काळत एअरसेल मॅक्सिसला आपल्या अधिकारकक्षेपेक्षा अधिक मंजूरी दिली आहे. चिदंबरम यांच्या निर्णयामुळे काही व्यक्तींना फायदा झाला. या फायद्याच्या बदल्यात चिदंबरम यांनाही लाभ मिळाला, असा आरोप तपास संस्थांनी केला आहे.
“एअरसेल मॅक्सिस’ प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. तरा या प्रकरणतील मनी लॉंडरिंग, बनावट कंपन्यांद्वारे केले गेलेले व्यवहार आणि अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास “ईडी’ करत आहे.