‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटात श्रेयस तळपदेची एन्ट्री; साकारली महत्त्वाची भूमिका

Shreyas Talpade In Chandu Champion| बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाची पोस्टर आणि ट्रेलरपासून खूप चर्चा होती. ‘चंदू चॅम्पियन’ ही भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मुरलीकांत पेटकर यांची प्रेरणादायी सत्यकथा आहे. कार्तिक आर्यन मुख्यभूमिकेत असलेल्या या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील आहेत. हेमांगी कवी आणि अभिनेता श्रेयस तळपदेही या चित्रपटात आहे.
नुकतेच श्रेयस ‘चंदु चॅम्पियन’चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी माहिती देत दिग्दर्शक कबीर यांचे आभार मानले आहेत. श्रेयसने या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरची भुमिका साकारली आहे. या भूमिकेतील त्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, “मुरलीकांत पेठकर यांच्या ‘चंदु चॅम्पियन’ या बायोपिकमध्ये मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळेंची भूमिका साकारण्याचा मोठा मान मिळाला आहे. ज्यावेळी दिग्दर्शक कबीर खान यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली. तेव्हा सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की, आपल्या महाराष्ट्रातील अनेकांना या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनविषयी माहिती नाही.” Shreyas Talpade In Chandu Champion|
View this post on Instagram
दिग्दर्शकाचे आभार मानत त्याने लिहिले, “मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांची भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक कबीर भाईंचे मनापासून आभार. अनेकदा माझ्या मनात विचार यायचं की, तू माझा या भूमिकेसाठी का विचार केला असेल? पण, तू योग्य निर्णय घेतलास. त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग….” Shreyas Talpade In Chandu Champion|
यावेळी त्याने कार्तिक आर्यनचे देखील कौतुक केले आहे. “कार्तिक खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने ‘चंदू’ची भूमिका साकारली आहेस. बायोपिकमध्ये काम करणं हे खूप कठीण असतं. बायोपिकमध्ये काम करताना त्या पात्राप्रमाणे काम करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. तू चित्रपटामध्ये जीव ओतून काम केलं आहेस. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट आणि तुझे येणारे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! ‘चंदू चॅम्पियन’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा…ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका,” असे आवाहन ही श्रेयसने केले आहे.
दरम्यान, ‘सत्यप्रेम की कथा’नंतर कार्तिक आर्यनने ‘चंदू चॅम्पियन’मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांची कथा आहे. यात पेटकर यांचा सैनिक, बॉक्सर होण्यापासून ते प्रसिद्ध जलतरणपटू होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, जम्मू आणि काश्मीरसह अनेक ठिकाणी झाले आहे.
हेही वाचा:





