रायपूर – छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला तीनच दिवस राहीले असताना माओवाद्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याची हत्या केली आहे. ते प्रचार अभियानात सहभागी झाले असतानाच त्यांची हत्या झाली आहे.
रतन दुबे असे त्यांचे नाव असून ते भाजपच्या नारायणपुर जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष होते. जिल्ह्याच्या कौशलनार भागात आज ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 तारखेला असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.