नवी दिल्ली : चेन्नईन एफसी संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात एटीके संघाचा ३-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह चेन्नईन एफसी संघाची प्लेआॅफ मध्ये पोहचण्याची आशा अजूनही कायम आहे. तर, एटीकेच्या संघाने याआधीच प्लेआॅफ मध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
.@ChennaiyinFC's crucial win strengthens their top-four chances and dents a blow to @ATKFC's league-winner hopes!#ATKCFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/PKvPRB0Ub5
— Indian Super League (@IndSuperLeague) February 16, 2020
चेन्नईन एफसी संघाकडून राफेल क्रिवेलारोने ७ व्या, आंद्रे शेमबरीने ३९ व्या तर नेरिजस वाल्सकिसने (९०+४) मिनिटाला गोल केले. एटीके संघाकडून राय कृष्णाने ४० व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
या विजयासह चेन्नईन एफसीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला असून त्याचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. या स्पर्धेत एफसी गोवाचा संघ अव्वलस्थानी आहे.