पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एसएनडीटी विद्यापीठातील जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे मेगा इव्हेंट २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला. यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थिनींनी नृत्य, संगीत, रांगोळी, विविध तांत्रिक खेळाच्या स्पर्धेत सहभाग घेतला.
मेगा इव्हेंट २०२४ ची सुरुवात ढोल ताशाच्या गजरात करण्यात आली. उद्घाटनसाठी एसएनडीटीच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पौर्णिमा मेहता, ए.सी.पी रुक्मिणी गलांडे, आर जे. अपूर्वा जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी एसएनडीटी महाविद्यालयातील मुलींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते.
व्यवस्थापनविषयक खेळ आणि मिस २०२४ ही स्पर्धाही घेण्यात आली. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कांचन मोटवानी मिसेस पुणे २०१८ व प्रियांका हिरे यांना आमंत्रित केले होते. मिस २०२४ हा पुरस्कार एमबीए प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रतीक्षा चंदन हिने मिळवला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींना डॉ. अनामिका सिंग व डॉ. चंद्रानी सिंग यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एमबीए आणि एमसीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींनाही पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी डॉ. विदुला अनिल अडकर, डॉ. प्रवीण गोसावी, डॉ. संतोष आपटे, प्रा. पूनम नकाते, प्रा. रितू अवस्थी, आबा पिंगळे, प्रतीक्षा दळवी, अभिजीत भिसे, श्वेता बहूतुले, सौरभ पवार यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात गरवारे, मराठवाडा मित्र मंडळ, सिंहगड व एसएनडीटी महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.