मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले-2’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली ‘शेवंता’चं खर नाव अपूर्व नेमळेकर आहे. अपूर्व रोज रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंता बबून प्रेक्षकांच्या समोर येते.
गेले तीन ते साडेतीन महिन्यांपासून सर्व मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. आत अनलॉक 1 च्या टप्प्यात हळूहळू चित्रिकरणास सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या दिवसात अपूर्वा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे संवाद साधत आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत.
नुकतंच अपूर्वाने इंस्टाग्रामवर आपले ग्लॅमरस अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते हैराण झाले असून आपल्या लाडक्या शेवंतावर सुंदर चारोळ्या रचून त्यांनी तिचे कौतुक केले आहे. या फोटोमध्ये अपूर्वा ने निळ्या रंगाचे वेस्टर्न आऊटफिट्स घातले असून यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.