पुणे – बकरी ईदनिमित्त दि. 12 रोजी (सोमवारी) शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. ईदगाह मैदानावर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करुन ईद साजरी केली जाते. त्यामुळे ईदगाह मैदान, गोळीबार चौक या परिसरात गर्दी होते. त्यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोमवारी सकाळी 6.30 वाजेपासून नमाज पठण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
असे असेल सोमवारचे वाहतूक नियोजन
– नमाज पठणावेळी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद.
– सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठणाच्या वेळी बंद.
– सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान रस्ता, सोलापूर रोडने मम्मादेवी चौकात येथे जाणारी वाहतूक, गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग, भैरोबा नाला ते गोळीबार मैदान रस्त्यासह कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी.
या मार्गांचा करता येणार वापर
– बंद मार्गांऐवजी गोळीबार चौक-सीडीओ चौक-गिरीधर भवन चौकामार्गे सेव्हनलव्हज चौकासह लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक मार्ग खुला.
– लुल्लानगर येथून येणाऱ्यांनी खाण्या मारूती चौक, खटाव बंगला चौक-नेपियार रोड- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक-भैरोबा नाला येथून गिरीधर भवन चौक या मार्गाचा वापर करावा.
– सॅलिसबरी पार्क -सीडीओ चौक- भैरोबानाला हा मार्ग, मम्मादेवी चौक-बिशप स्कूल मार्ग किंवा कमांड हॉस्पिटल मार्ग, प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला-वानवडी बाजार चौक हा मार्ग खुला असेल.