लहानग्याने अजित पवारांसमोर मांडली व्यथा
सांगली: सांगली, कोल्हापुरात पुराणे थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते सांगली कोल्हापूरला दौरे करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील पुरग्रस्तांची भेट घेतली. दरम्यान, अजित पवारांनी भेटदरम्यानचा एक किस्सा सांगितला.
अजित पवार म्हणाले, जयसिंगपूर येथील लहान मुलगा पुरामध्ये अडकला होता. त्याने मला महापुरामुळे त्याची सात दिवस शाळा बुडाल्याचे सांगितले. ‘पुस्तके वह्या संपूर्ण पाण्यामध्ये भिजले आहेत. मला ती कोण आणून देणार?’ अशी व्यथा त्या लहानग्याने मांडली.
अजित पवारांनी यावर पुग्रस्तांना दिलासा दिला. पुराच्या पाण्यात शालेय साहित्य वाहून गेलं,याबाबत प्रांताध्यक्षांसोबत बोलणी केली. मुलं आणि त्यांच्या शाळांची नोंद असल्यानं त्या-त्या इयत्तामधली नवी पुस्तकं-वह्या,दप्तरं दिली जातील. सोबत विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यासक्रमही शिकवला जाईल. यात विद्यार्थी वर्ग सहकार्य करेल,यात शंका नाही.