अजय केवाळेच्या मल्टीपर्पज स्टॅन्डची जिल्हा स्तरावर निवड

मंचर- आमोंडी (ता. आंबेगाव) येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयाने गिरवली येथील भैरवनाथ विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदिवासी गटात प्रथम क्रमांक संपादन केला आहे.
लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी अजय संतोष केवाळे याने तयार केलेल्या मल्टीपर्पज स्टॅन्डची जिल्हा स्तरावर निवड
झाली आहे. या उपकरणाचा उपयोग दुचाकी वाहनांना साइड स्टॅण्डमुळे होणारे धोके व अपघात टाळण्यासाठी होणार आहे.

नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ संजीव धुरंदर व पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार सोनावले याच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, रुपाली जगदाळे, माजी सभापती कैलासबुवा काळे, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, सरपंच संतोष सैद, अरुण हगवणे, अनिल सैद, मुख्याध्यापाक के. के. सैद, जी. एन. फापाळे, व्ही. डी. हगवणे, जनार्दन मेंगडे, विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी, विज्ञान शिक्षक, ग्रामस्थ आणि बालवैज्ञानिक यावेळी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)