नवी दिली : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. चांद्रयान-3 ने या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इसरॉकडून देण्यात आली आहे. याबाबत इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
इस्रोने ट्विटमध्ये, ‘चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 23.00 वाजता पार पडणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या यानाने चंद्राच्या अंतराच्या दोन तृतीयांश अंतर पूर्ण केलं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच पहिला संदेश पाठवला आहे.” असे म्हटले आहे.
चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत पोहोचताच इस्रोसाठी खास संदेश पाठवला. हा संदेश असा आहे, “MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity.” म्हणजेच “मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC, बंगळुरू. हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्र गुरुत्वाकर्षण जाणवत आहे.”असे म्हटले आहे.’
Chandrayaan-3 Mission:
The spacecraft has covered about two-thirds of the distance to the moon.Lunar Orbit Injection (LOI) set for Aug 5, 2023, around 19:00 Hrs. IST. pic.twitter.com/MhIOE65w3V
— ISRO (@isro) August 4, 2023
इस्रोने ट्वीटमध्ये म्हटलं की, “चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. पुढील ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन रविवारी रात्री 11 वाजता केलं जाईल. इस्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असलेल्या उपग्रहाला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी आणखी चार ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन केले जाणार आहेत.
चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल.