मुंबई : मराठा आरक्षणावर राज्य आणि केंद्राच्या भूमिकेच्या मुद्यावरून राज्यातील सत्ताधारी-विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अलिप्त भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती.
चंद्रकांत दादा,
प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. pic.twitter.com/RsCxq6EyE8— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की,’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी मोदींविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.’ . त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच विधानावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पाटलांवर पलटवार केला आहे.
महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. pic.twitter.com/L9I3AC664C
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
संचित सांवत यांनी ट्विट केले आहे की,’चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे.’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे.’ असं म्हणत सावंत यांनी पलटवार केला आहे.