पौड – मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात असलेल्या कुळे गावच्या प्रवेशद्वारवर पुढाऱ्यांना गावबंदी असे फलक लावण्यात आलेले आहेत. तर गावकरी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळकटी देण्यासाठी कुळे ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले आहेत मुळशीत मराठा आरक्षण मिळण्याकरिता नागरिकांनी साखळी पद्धतीने आंदोलन करण्यास सुरवात करण्यात आली आहे
मुळशी तहसील आवारात मुळशीतील राजकीय पदाधिकारी एकत्रित येऊन मराठा आरक्षण मिळण्यासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे )मुळशी तालुकाच्या वतीने आणि मुळशी तालुका संघर्ष समितीच्या वतीने लेखी स्वरूपात पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावे याकरिता वेगवेगळ्या घोषणा आंदोलक या वेळी देत असून याची तीव्रता वाढण्याची शक्यता दिसून येते येत्या काळाला मुळशीतील गावोगावी आंदोलन करून निषेध करण्यात येऊ शकतो.