नकलाकार कधी देश घडवत नाहीत ; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना टोला

नाशिक: छगन भुजबळ मोदीसाहेबांची मिमिक्री करत आहेत. पण भुजबळ साहेब तुम्ही अंगविक्षेप करू शकता, चांगली नकली करू शकता. मात्र नकलाकार कधी देश घडवत नाही. त्यासाठी नरेंद्र मोदीचं पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांचा समाचार घेतला. नाशिकध्ये आज भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. दरम्यान, याठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 15 वर्षांपासून भुजबळांनी केवळ आश्वासनं दिली. आम्ही नुसती आश्वासनं दिली नाहीतर करून दाखवली आहे,पहिला पाऊस पडल्यानंतर मांजरपाडा बोगद्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.