पुणे – मध्य रेल्वेकडून प्रवासी वाहतुकीच्या बरोबरीने मालवाहतुकीवरदेखील लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. मागील 165 दिवसांत मध्य रेल्वे 4.25 लाख वॅगनद्वारे 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक केली.
मध्य रेल्वेने 23 मार्च ते 3 सप्टेंबर या कालावधीत 8 हजार 899 मालगाड्यांच्या माध्यमातून 4,24,931 वॅगन्स मालवाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी 2 हजार 575 वॅगन्सची मालवाहतुकीचे लोडिंग करण्यात येते.
यामध्ये अन्नधान्याच्या 2 हजार 634 वॅगन्स, साखरेच्या 2 हजार 214 वॅगन्स, खतांच्या 19 हजार 921 वॅगन्स, कांद्याच्या 6 हजार 192 वॅगन्स आदीचा समावेश आहे. याचबरोबर वीज पुरवठ्यासाठी विविध वीज प्रकल्पांना 1 लाख 60 हजार वॅगन कोळसा लोड केला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.