kutimb

श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांनी केले "वेडात मराठे वीर दौडले सात " व "प्रभो शिवाजी राजा" गीतांचे सादरीकरण

चिंचवड – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विक्रम काळे तसेच झी युवा वाहिनी वरील संगीत सम्राटचे उपविजेते दर्शन व दुर्वांकुर कुलकर्णी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव राजेंद्र कुमार मुथा, सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार कांकरिया ,कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य विक्रम काळे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे स्पष्ट केले.

माजी विद्यार्थी दर्शन व दुर्वांकुर कुलकर्णी यांनी” वेडात मराठे वीर दौडले सात ” व “प्रभो शिवाजी राजा” ही अप्रतिम गीते सादर केली. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. यानिमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु.आरती कुबडे कु . रवीना खरात ,कु .आरती नलावडे यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडला .

कार्यक्रमाच्या निमित्ताने कॅमलिन आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये दहावी-बारावीच्या गटात सोहेल पठाण, मनस्वी वायाळ, राधिका भोसले तर पाचवी सहावीच्या गटात साहिल थोरात, निखिल कांबळे यांनी यश संपादन केले.

राज्यस्तरावरील एकाच शाळेतील पाच बक्षिसे मिळवणारी पिंपरी चिंचवड मधील एकमेव शाळा ठरली. त्यांना कलाशिक्षक गजानन हरिदास यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक शशिकांत हुले, विभाग प्रमुख मीना मेरुकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुरवसे तर आभार प्रदर्शन रामनाथ खेडकर यांनी केले .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.