डेक्‍कन क्वीनचा वाढदिवस साजरा

पुणे -पुणे-मुंबई मार्गावरील डेक्‍कन क्वीनच्या नियमित प्रवाशांकडून गाडीचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा गाडी पुण्यात येणार असल्याने गाडीचा 91 वा वाढदिवस साजरा करता येणार नसल्याने, प्रवासी हिरमुसले होते.

यंदा स्थानकात सजवलेल्या डेक्‍कन क्वीनच्या उपस्थितीत वाढदिवस होणार नसल्याने, प्रवाशांची थेट गाडीच्या प्रतिकृती ठेवून वाढदिवस लक्ष्मी रस्त्यावर आणि पुणे स्थानकातील तिचा फोटो असणाऱ्या परिसरात साजरा केला.

यावेळी पंजाब मेल एक्‍स्प्रेसचा वाढदिवसदेखील साजरा झाला. यंदा प्रवासी संघटनेने एकत्र येत डेक्‍कन क्वीनच्या आठवणींना उजाळा देत केक कापून वाढदिवस साजरा केला, अशी माहिती प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.