मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे सतत व्यग्र असणारी कलाकार मंडळी आणि सामान्य नागरिक आता घरात बसून आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये तुम्ही बॉलिवूडमधील काही धमाल चित्रपट पाहून आपल्या कुटुंबा बरोबर चांगला वेळ घालू शकता.
अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी
रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधील सगळेच चित्रपट
अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई
संजय दत्त, अर्शद वारसी, रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला धमाल चित्रपट
खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा जॉनी एलएलबी 2