खताळांच्या नातवाने मागितली युतीकडे उमेदवारी

संगमनेर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांच्या निधनाला आठवडा ही होत नाही तोच त्यांच्या पुण्यातील नातवाने संगमनेरमधून सलग सात वेळा विजय झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी घेलेल्या मुलाखतीत उमेदवारीवर दावा केला आहे.

शिवसेना व भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. युती न झाल्यास दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार असतील. हाच धागा पकडत खताळ यांनी या दोन्ही पक्षांकडे मुलाखत दिली. भाजपच्या मुलाखतीसाठी ते स्वत: नगरमध्ये उपस्थित होते. माजी मंत्री खताळ यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. दुखवट्यामुळे बुधवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मुलाखतीसाठी विक्रमसिंह स्वत: उपस्थित राहिले नाही. मात्र त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. विक्रमसिंह यांचे वास्तव्य पुण्यात आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघाशी त्यांचा तसा थेट संबंध नाही. मात्र माजी मंत्री खताळांचे नातू म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या उमेदवारीला मंत्री विखे यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मुलाखतीत तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, कैलास वाकचौरे, ऍड. दिलीप साळगट, जयवंत पवार, संजय फड, अप्पा केसेकर, ऍड. संग्राम जोंधळे, अशोक सातपुते, शरद पावबाके, विठ्ठल घोरपडे, दत्तू नाईक, शिवसेनेत आलेले ऍड. संग्राम जोंधळे व शरद थोरात यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.