महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद

महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद

पुणे – महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणाऱ्यास समर्थ पोलिसांनी राजकोट येथून जेरबंद केले. संबंधीत व्यक्ती विवाहीत असून तो एका केटरींग फर्ममध्ये आचाऱ्याचे काम करतोसंदीप सुखदेव हजारे(29, रा.बेदीपुरा, राजकोट, गुजरात)असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती.

फिर्यादी तरुणी एका अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेते. तीच्या मोबाईल क्रमांकावर असलेल्या व्हॉटसअप तसेच फेसबुकवर संदीप हा सातत्याने चॅटींग करत होता. तीचे फोटो व्हॉटसअप प्रोफाईलवर पाठवून तुझ्यावर प्रेम करतो असे मेसेज पाठवत होता. काही दिवसानंतर त्याने तीला अश्‍लिल मेसेज पाठवण्यास सुरवात केली. त्याच्या मेसेजला वैतागून संबंधीत तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी मेसेज येत असलेला मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता तो एका महिलेच्या नावावर रजिस्टर असल्याचे पुढे आले. या महिलेकडे तपास केला असता, तीने मोबाईल आपला पती वापरत असल्याचे सांगितले. तपासात तो राजकोट येथे केटरींगचे काम करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार राजस शेख,पोलीस नाईक प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई स्वप्निल वाघुले, निलेश साबळे
गणेश शेंडे, अनिल शिंदे, साहिल शेख, गणेश कोळी यांनी तांत्रीक तपास करत त्याला राजकोट येथील मौजे बेदीपुरा येथून ताब्यात घेतले. त्याला पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्या समोर हजर करण्यात आले. त्याने राजकोट येथे आचाऱ्याचे काम करत असल्याचे व मुळ सातार जिल्हयातील खटाव तालूक्‍यात आंबवडे येथील असल्याचे सांगितले. त्याच्याविरुध्द कराड तालुका पोलीस स्टेशन येथेही एका महिलेला अश्‍लिल मेसेज पाठवल्याचा गुन्हा दाखल आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×