ई-पेमेंट अयशस्वी झाल्यास बँका देणार दररोज शंभर रुपये

ये नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा काही कारणास्तव ट्रान्झॅक्शन फेल होतात. परंतु, आता ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाल्यास व ते पैसे एका दिवसात परत न दिल्यास बँक तुम्हाला दररोज १०० रुपये देणार आहे. यासंबंधी आरबीआयने एक नोटीस जाहीर केली आहे.

नोटिसीनुसार, एका दिवसाच्या आत ग्राहकाला पैसे परत मिळाले नाहीतर बँक आणि डिजिटल वॉलेटला दररोज १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. हे नवे नियम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), इमीडिएट पेमेंट सिस्टम(IMPS), ई-वॉलेट्स, कार्ड टु कार्ड पेमेंट, नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (NACH) यावर लागू होणार आहेत.

आरबीआयने म्हंटले कि, तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर अयशस्वी व्यवहारासाठी कालावधी व दंडाची रक्कम निश्चित केली गेली आहे. यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि अयशस्वी व्यवहाराच्या प्रक्रियेत एकसारखेपणा येईल.

दरम्यान, डिजिटल व्यवहाराव्यतिरिक्त आरबीआयनेही नॉन-डिजिटल व्यवहारासाठीही कालावधी निश्चित केली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममधील अयशस्वी व्यवहारासाठी खात्यात पैसे मिळवण्यासाठी ५ दिवसांची मुदत निश्चित केली आहे. यानंतर दररोज १०० रुपये दंड भरावा लागेल. पॉईंट ऑफ सेल (कार्ड स्वाइप मशीन) आणि ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीतही हा कालावधी ५ दिवसांचा असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here