Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. त्यापूर्वीच सर्वच महत्वाच्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी नेमकं कोणत्या मतदार संघतून लढणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. | Lok sabha election 2024
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती आहे. यूपीमध्ये काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर सपा मध्यप्रदेशातील 1 जागेवर आपली ताकद दाखवेल. अशात राहुल गांधींनी पुन्हा युपीमधून लढल्यास पक्षामध्ये उत्साह संचारू शकतो असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत. | Lok sabha election 2024
त्यामुळे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून अमेठीमधून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आता सुरु झाली आहे. यासोबतच प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात.असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. ही चर्चा खरी ठरली तर प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसतील. | Lok sabha election 2024
सोनिया गांधी राज्यसभेवर
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा रायबरेलीच्या जागेवरून पक्ष प्रियंका गांधी यांना संधी देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दुसरीकडे, राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली तर पुन्हा एकदा 2019 प्रमाणे राहुल विरुद्ध स्मृती इराणी असा सामना पाहायला मिळू शकतो.