CAA Rules। केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधीची अधिसूचना मार्चच्या पहिल्या आठवड्यात जारी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. प्राप्त माहितीनुसार, CAA चे नियम मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू केले जाऊ शकतात. नियम जारी करताच कायदा लागू होणार आहे. 2019 मध्ये लोकसभेत CAA कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
एका इंग्रीजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने, “तुम्हाला तारीख सांगू शकत नाही, परंतु आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही माहिती दिली जाईल.” म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच CAA लागू होईल ” असे म्हटले आहे..
कायदयाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही? CAA Rules।
2019 मध्ये चार वर्षांपूर्वी कायदा बनला असूनही, नियम अधिसूचित न केल्यामुळे CAA अद्याप लागू झालेला नाही. CAA नुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलीय. त्याचबरोबर मुस्लिमांना यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. आता लवकरच नियम लागू होऊन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येतंय.
पोर्टलद्वारे अर्जदारांना वैधता सिद्ध करावी लागणार CAA Rules।
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी नियम तयार करण्यात आले असून ऑनलाइन पोर्टलही तयार करण्यात आलंय. या पोर्टलवर अर्जदारांना नियमानुसार त्यांची वैधता सिद्ध करावी लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वी नियम लागू केले जातील, असे विधान केले होते. 2019 मध्ये केंद्र सरकारने हा कायदा आणला तेव्हा देशभरात निषेध दिसून आला. हा कायदा संविधानाच्या विरोधात असून मुस्लिमांमध्ये भेदभाव करणारा आहे, असे म्हटले गेले होते.