पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित सी.ओ.ई.पी. टेकचे (पूर्व पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय) वार्षिक, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक महोत्सव (फेस्ट) ‘इम्प्रेशन्स’ यंदा सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या विद्यार्थी-संचलित महोत्सवाची ख्याती आज पूर्ण भारतभर पसरली असून, आता राष्ट्रीय व जागतिक पातळीवरचे कलाकार आणि दूरहून येणारे विद्यार्थी देखील या ‘इम्प्रेशन्स’ मध्ये भाग घेऊन कार्यक्रमांची शोभा वाढवत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यातील 22,23 आणि 24 तारखेपासून सुरू होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सव अवघा काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी सर्वात अग्रगण्य मराठी वृत्तपत्रांपैकी एक म्हणजे “प्रभात” समुह इम्प्रेशन्स 2022 ला “डिजिटल मीडिया पार्टनर” म्हणून लाभला आहे.
सचिन पिळगावकर, सुबोध भावे, पंकज त्रिपाठी, सुमित राघवन, विक्रम गोखले आणि स्वप्निल जोशींसारख्या हिंदी व मराठी चित्रपसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी आजवर सी.ओ.ई.पी. टेक च्या या उपक्रमात आपली हजेरी लावत प्रतिसाद दिला आहे. एवढेच नव्हे, तर महेश काळे व अनुव जैन पासून पं. राकेश चौरसिया आणि पं. शौनक अभिषेकींसारख्या सूर-संगीत जगतातल्या सिताऱ्यांनी ‘इम्प्रेशन्स’ च्या मंचावर आपली छाप सोडली आहे. यूके, रशिया व अमेरिकेसारख्या देशातून आलेल्या प्रतिष्ठित कलाकारांनीदेखील स्पर्धकांचे मूल्यांकन करून सहभाग घेतला आहे.
साधारण 15000 हून अधिक युवक-युवती दरवर्षी इम्प्रेशन्स ला भेट देतात. कोविडच्या काळात पूर्णतः ऑनलाईन झालेला इम्प्रेशन्स मागच्यावर्षी आंशिकिरीत्या ‘ऑफलाईन’ झाला होता. कोविड नंतर पहिल्यांदाच संपूर्ण फेस्ट पुन्हा सी.ओ.ई.पी. टेक च्या ऐतिहासिक आवारात होत असल्याने आयोजक विद्यार्थी प्रचंड उत्साही आहेत.
View this post on Instagram
सी.ओ.ई.पी. टेक या 168 वर्ष जुन्या महाविद्यालयाला नुकताच शासकीय विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्याने यावर्षी सर्वांचाच उत्साह वाढला आहे.
C.O.E.P. Tech | सांस्कृतिक महोत्सव ‘इम्प्रेशन्स 2022’च्या थरारासाठी 1 महिना बाकी!
येत्या डिसेंबर महिन्यातील 22,23 आणि 24 तारखेला, 6 मॉड्यूल्समध्ये विभाजित 24 वेगवेगळ्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धा महोत्सवात घेतल्या जाणार.
सविस्तर बातमी
👇👇https://t.co/Der9Z6HjGQ pic.twitter.com/Bn8XuLgitl— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 30, 2022
यावर्षी Waiu प्रस्तुत इम्प्रेशन्स 2022: “प्रवाह – ॲन आर्टिस्टीक जर्नी” अर्थात “एक कलात्मक प्रवास” या संकल्पनेच्या अवती-भोवती रंगणार आहे. Travel Pays, Bookitngo, Chingari व Frother सारखे प्रतिष्ठित समूह इम्प्रेशन्स 2022 ला प्रायोजक म्हणून लाभले आहेत. तसेच सर्वात अग्रगण्य मराठी वृत्तपत्रांपैकी एक म्हणजे “प्रभात” समुह इम्प्रेशन्स 2022 ला “डिजिटल मीडिया पार्टनर” म्हणून लाभला आहे.
After-movie of Impressions’21 : https://youtu.be/NYaXHLVZAEQ
Theme Reveal video of impressions’22 : https://youtu.be/za5KREwwrdE
नोंदणी संकेतस्थळ : https://www.impressionscoeptech.com/events/
सी.ओ.ई.पी. टेक च्या या महोत्सवाला एक नवी ओळख म्हणून, ‘क्लिओ’ हा सुगरण पक्षी (Weaver bird) इम्प्रेशन्स चा मॅस्कॉट अर्थात प्रतीक म्हणून साकारण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे हा पक्षी घरटी बांधण्याच्या उत्कृष्ट कलेसाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे कलाकार इम्प्रेशन्स मध्ये येऊन आपल्या कलेच्या जोरावर प्रसिद्धी व सन्मान मिळवतात.
रेखाटन आणि नृत्यकलेपासून ते गायन व शायरीपर्यंत सर्व प्रकारच्या स्पर्धांद्वारे युवा पिढीतील कला-कौशल्याला एक हक्काचे व्यासपीठ म्हणून इम्प्रेशन्सची निराळी ओळख आहे. वारसा पुढे चालवत, येत्या डिसेंबर महिन्यातील 22,23 आणि 24 तारखेला, 6 मॉड्यूल्स मध्ये विभाजित 24 वेगवेगळ्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धा ‘इम्प्रेशन्स’ च्या 3 दिवसातंत घेतल्या जाणार आहेत. तसेच मोठ्या कलाकारांच्या मैफिलिंचादेखील आस्वाद या वेळी आपल्याला घेता येईल.