अहमदाबाद – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज गुजरात मधील एका पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांपुढे तब्बल 25,000 “शून्य” वीज बिले सादर केली. आम आदमी पक्षाला विधानसभा निवडणुकीत गुजरात मध्ये सत्ता मिळाल्यास येथील नागरीकांनाहीं अशीच शुन्य रूपयांची वीज बिले मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
Gujarat Election 2022 : आम आदमी पक्षाला एखादीही जागा मिळणे अवघड – अमित शहा
ते म्हणाले की पंजाबातील निवडणुकीपुर्वी आम्हाला तेथे जे वातावरण दिसले तसेच वातावरण गुजरातमध्येही आम्हाला दिसत असून आमचा पक्ष प्रचंड बहुमताने गुजरातेत सत्तेवर येईल असा विश्वासही भगवंत मान यांनी व्यक्त केला. गुजरात मधील नागरीकांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.
Gujarat Election 2022 : आम आदमी पक्षाला एखादीही जागा मिळणे अवघड – अमित शहा
येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मान म्हणाले की, पंजाबमधील 75 लाख घरांपैकी 61 लाख घरांमध्ये शून्य वीज बिल दिले जात आहे, जे आपच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. ते म्हणाले की मी 25,000 शून्य वीज बिले आणली आहेत ज्यांची नावे आणि पत्ते तुम्ही तपासू शकता.आमच्या राज्यातील तब्बल 61 लाख घरांना शून्य वीज बिल मिळाले आहे.
आम्ही जे बोलतो ते करतो आणि आम्ही जे करू शकतो तेच आम्ही मांडतो असे ते म्हणाले. मान म्हणाले की पंजाब सरकारने 15 ऑगस्टपर्यंत 100 मोहल्ला क्लिनिक्सची स्थापना केली आहे आणि 26 जानेवारीपर्यंत अशा 500 हून अधिक क्लिनिक्सची स्थापना करण्याची योजना आहे.
पंजाबमधील आप सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना परत करण्याची हमी देखील दिली होती आणि त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. पंजाब मध्ये आमदारांना ते जितके वेळा निवडून आले आहेत त्या प्रमाणात त्यांना पेन्शन दिली जात होती. पण आम्ही ती पद्धत बंद केली. त्यामुळे सरकारचा मोठ्याप्रमाणातील खर्च वाचला असल्याचे त्यांनी सांगितले.